ऐकल खुप होत वासोटा बद्दल. अन् आता जवळून अनुभवल देखील. या प्रवासाची सुरुवात झाली गरवारे कॉलेज पासुन. मी अन् वेदांती बाकी अजुन 20 जण माझ्या साठी अनोळखी होती सगळेच.
रात्री १०:३० ला प्रवासाची सुरुवात झाली, काही वेळातच अंताक्षरी सुरू केली. बघता बघता खुप गाणे झाले, गाण्याचा खजिना येवढा मोठा आहे की २-३ वाजले पण गाणे मात्र संपले नाही. खर तर मला खुपच जास्त मज्जा येत होती, कारण मला गाणे येतच नाही, मग मी ऐकण्याच काम करत होते. गाडीच्या खिडकीतुन बाहेरील अंधारात पाहीले की अस वाटत होत, जणु खाली जमीन वर आकाशातील तारे उतरले आहे, अन् आत सोबतच गाणे जुने, नवे, मराठी, हिंदी सगळ्या प्रकारचे. मस्त मैफिल जमली होती.
गाण्याच्या धुंदीत कधी वासोट्याच्या जवळ पोहोचलो कळालेच नाही, तरी रात्रीचे १:३० ला तिथे पोहचलो. बापरे किती सारे तंबू 🎪 होते, ऐवडी गर्दी होती, खुप सारे ग्रुप आले होते, एका ग्रुपची मस्त गिटार🎸 वाजवत गाणे चालु होते, मध्येच कुणीतरी त्यावर नृत्य💃 करायला लागले, वरती मोकळे आकाश, समोर शेकोटी, अन् थंड हवेचे वातावरण, सोबतच आमच्या ग्रुपचे तंबू तयार झाले व सर्व जण शेकोटी भोवती गप्पा मारत बसले, गप्पा कोणत्या तर भुताच्या…. असेच ३ वाजले सगळे झोपायला गेले, मी अन् वेदांती बाहेरच थांबलो, तंबूत गेले की थंडी जाणवत होती. मग काय वेद आणि मी बाहेर च थांबलो. ४ वाजता तंबू मध्ये गेलो. जोप तर नाही आली. सकाळी ६ वाजता उठलो अन् आवरल. नाष्टा केला अन् मग आमची नावेतून प्रवासाची तयारी सुरु झाली.
काय वर्णन करू, कमी होईल ते पण,तो तीन बाजूंनी डोंगर रांगा नी वेढलेला शिवसागर जलाशय त्यात पडलेल सुर्या च प्रतिबिंब, जसे की पाण्यावर तरंगणारे असंख्य मोती, मध्येच छोटे-छोटे बेट अन् त्यावर त्या पांढरा शुभ्र पक्षाच्या थव्याने तिथले दृश्य अधिकच मोहक बनले होते. नाव जसजशी पुढे जाईल तसा तो शिवसागर दाट अरण्यात शिरल्या सारखाच जाणवत होता. शिवसागरातील प्रवास पुर्ण करुन वासोट्याच्या पायथ्याशी पोहोचलो. आता मोकळे आकाश अन् खाली अथंग पाण्यातील प्रवास नसुन घनदाट जंगलात प्रवास करायचा हे जाणले.
जंगल प्रवास करण्यासाठी अगोदर नाव नोंदणी केली. तीथेच वरील जंगलाची प्रचीती आली. मग आमचा वासोटा किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अन् सुरुवातीलाच मी धडपडले , एक क्षण तर वाटल पाय मुरगळा की काय, पण निरंजनी सावरलं. उठले अन् परत जोशानी चालायला सुरूवात केली. मग काय न थांबता प्रवास सुरु झाला. जंगलात जसे जसे पूढे जाव तस झाडांची वर्दळ वाढतं च होती. जांभा खडकांचे दगड त्यावर चालुन चालुन गुळगुळीत व चमकदार दिसत होते. कोळ्यांनी त्यांचे काम अगदी चोखपणे पार पडली होती , त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर विविध किल्ष्ट जाळे पाहायला मिळतात. त्याच प्रमाणे उंच उंच झाड जसे आभाला शिवण्यासाठी त्यांच्यामध्ये शर्यत लागली की काय असा भास कुणाला ही सहज होईल. त्याचप्रमाणे काही काही ठिकाणी विशाल असे दगड आहेत , जणू काही ती आपल्या स्वागत करण्यासाठी उभी आहेत . तसेच दोन ठिकाणी पाण्याची झरे आहेत आणि त्यातील थंड पाणी आपल्या तील थकवा दूर होण्यास मदत करतात, अन् ते स्वच्छ पाण्याने मन आपोआप शांत होत. असंच काहीसं थांबत , रस्त्यात भेटणारी माणसं आणि झाडं झुडपांशी गप्पा मारत , हळूच मागे पुढे पाहत, २-२:३० तास जंगलातील प्रवास पुर्ण करुन वर पोहोचलो, अजून काही जण मागुन येतं होते. खुप भुक लागली होती, अन् खूप थकलो होतो , असं वाटतं होतं की इथेच झोपले तर निवांत झोप होईल. थोडा आराम करत आणिता ने द्राक्ष खातं गप्पा मारत बसलो होतो. तसेच जेवण करून आम्ही पुढे खरं वासोटा किल्ल्याच्या उर्वरित खूणा पाहण्यासाठी निघालो.
वरती पोहोचलो वर लगेच उजव्या हाताला मारुती मंदिर मोठ्या दिमाखात उभे होते, वर छप्पर नाही, भिंती पण जास्त उंच नाही. त्या मंदिराच्या उजव्या बाजूला एक रस्ता सरळ बाबु कड्याकडे जातो. ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. बापरे धडकी भरणारा आहे हा कडा. सरळ असा जसं की बरोबर कोणी तरी जाणुन कट केला असावा. समोरच असलेल्या डोंगर रांगेत जुना वासोटा दिसतो. अन् एका बाजूलाच शिवसागर जलाशयाच दृश्य पाहून मन थक्क होते. तसेच मंदिराच्या डावीकडे जाणारी वाट आपल्याला कोकणात जाणाऱ्या मार्गदर्शन करते. त्या कड्यावरून नागेश्वर सूळका दिसतो, अन् कोकणाचे मन मोहवून टाकणारे दृश्य पाहायला मिळते.
उतरतीचा प्रवास तर खूपच मजेशीर आहे. अन् त्याचबरोबर जोखीमीचा ही आहे. एक एक पाऊल काळजी पुर्वक टाकावं लागतं. स्वतः वर कसं गतीच्या काळात नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे हे लक्षात येते. आपली गती वाढलेली असती खरी पण ती आपल्याला काळजी नाही घेतली तर खूपच घातक ठरू शकती. वरती जाण्यासाठी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध लढा द्यावा लागतो अन् खाली उतरताना मात्र गुरुत्वाकर्षणामुळे मिळालेल्या गती वरील नियंत्रण ठेवण्यासाठी लढाई सुरू झाली होती. खाली उतरे पर्यंत पायांना मोठं मोठे गोळे आले होते. वेद अन् मी लवकरच एकत्र खाली पोहोचलो. त्यातच निखिल अन् मानसी सोबत ओळख झाली.
वासोट्याला निरोप तर देऊ वाटतं नव्हते, पण तिथले ही काही नियम असतात, त्यामुळे परत बोटांमध्ये बसलो. सगळेच चालून चालून थकले होते. काहीं तर मस्त झोपून घेतलं. पण सायंकाळची वेळ होती वातावरण कसं मस्त झालं होतं, मग मी कशी एवढी सुंदर संधी सोडणार बरं…! अन् ऐकलं होतं की सुर्यास्त खुपचं सुंदर दिसतो मला त्याची उत्सुकता लागली होती. माकडांची जोडी दिसली, पुढे काही अंतरावर निलगाय पाणी प्यायला जलाशय वर आलेली होती. वेगवेगळे पक्षी मस्त आकाशात उंच विहार करत होते, काही पक्षी मध्येच जोरात खालच्या दिशेने येऊन पाण्यात आत बाहेर करत होते. वातावरणांत थंडावा जाणवतं होता, सुर्याची किरणे आता शांत होत, डोंगराच्या मागे लपवण्यात गुंग होऊन गेलेला होता. आपली छटा आकाशात मस्त सोडत होता, त्यामुळे आकाशात रंग पाहून मन प्रसन्न झालं. अन् तो सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या डोंगराच्या रांगेतील सुर्यास्त खुपचं जास्त मनमोहक आहे.
पाण्यामध्ये थोडी मस्ती केली व फ्रेश होऊन, सगळे जण जेवण करण्यासाठी एकत्र जमलो. शाकाहारी लोकांसाठी वेगळा टेबल अन् आम्ही मांसाहारी साठी वेगळा टेबल केले. आम्ही चिकन थाळी घेतली. खूपच चविष्ट असं जेवण होतं, अन् सोबत गप्पा चालू होत्या. सगळेजण आपापल्या जुन्या आठवणी ताज्या करत होते. काही जुन्या ट्रेकच्या आठवणी निघाल्या. जवळपास ९ वाजले होते जेवण करून निघण्यासाठी. सगळेजण थकले असल्याने गाडीत सगळेजण शांत होते, काहीजण झोपले होते. मला तर झोप नव्हती येतं मग मी खिडकीतून डोकावून पाहत बाहेर पडलेल्या अंधारातील प्रकाशाच्या साम्राज्याची देखावे पाहण्यात रमले. खास करून गाडी घाटात प्रवास करत होती , तेव्हा खालील गावांचे दृश्य पडद्यावरील चित्र पाहात असल्याचं वाटतं होतं.
प्रवास कोणताही असो, मनाचे डोळे उघडले, तर दु:ख , थकवा, उदासीनता, सगळं कसं अगदी अदृश्य होत अन् त्याचबरोबर मन प्रसन्न होते.