दृष्टिकोन

एकदा वर्गातून सर्वांचा आग्रह करण्यात आला एक छानशी गोष्ट सांग , पण गोष्ट कोणती सांगावे याचा विचार करत होते तेवढ्यात विचार आला…. चला आज एक मस्त ‘ प्रेम कहाणी’ सांगावी तर ऐका मग…

एका महाविद्यालयात रासायनिक विभागात एक आकाश नावाचा विद्यार्थी होता खूप शांत अन् अभ्यासात हुशार. त्याच्याच महाविद्यालयात एक मेघा नावाची मुलगी देखील होती. दिसायला खूपच सुंदर . एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली, नंतर सतत भेटणं सुरू झालं आणि पुढे काहीच दिवसात ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं .

एक दिवस आकाश शिक्षण पूर्ण होऊन महाविद्यालयात द्वारे एका मोठ्या कंपनीत नोकरीलाही लागला . दोघांनी घरी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितले. घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली. दोघांचं लग्न झालं सोबत राहायला गेली, एक मस्त घर घेतलं होतं. एका नदीकाठी निवांत घर होतं. दोघे मजेत राहत होते.

आकाशला एक दिवस सकाळी कंपनीतून अचानक फोन येतो , त्याला तेव्हा समजतं की त्याला कंपनीच्या एका प्रोजेक्ट निमित्त चार दिवसासाठी परदेशात जावे लागणार आहे. तसे तो मेघाला सांगतोय अन् त्याला आजच निघावे लागणार होतं . त्यामुळे तो घरातली मेघा साठी आवश्यक असणारे सगळ्या गोष्टींची सोय करतो. जास्तीचा गॅस भरला, धान्य भरून ठेवली, गाडीत डिझेल फुल भरल, इत्यादी आणि तो जातो. मेघा घरात एकटी असल्याने तिला करमत नाही, म्हणून ती रोज सायंकाळी नदीकाठी फिरायला जात असे . नदीवरील पूल ओलांडून दुसऱ्या किनारी आपला वेळ घालवत असते. तिथे तिच्या एका पेंटर मुलाशी ओळख होती तो रोज तिथे सायंकाळी पेंटिंग काढण्यासाठी येत असे. दोघांची चांगली मैत्री होती.

असे चार दिवस संपतात व आकाश आज सायंकाळी घरी येणार असतो. रोजच्याप्रमाणे मेघा आकाश यायला वेळ आहे तोपर्यंत नदीकाठी जाऊन येनं होईल म्हणून नदीकाठी जाती. रोजच्या प्रमाणेच फेरफटका मारून पेंटर मित्राशी गप्पा करून घरी येण्यास निघाली. पण आभाळ भरून आलं होतं चांगलंच, त्यामुळे सूर्य मावळायला अजून वेळ असूनही अंधार दाटून आला होता .जोराचा वारा सुटला होता. नदीकाठी पाणी हळूहळू वाढत होतं. ती लगबगीने घरी जाण्यासाठी गाडी कडे गेली. गाडी सुरु केली आणि घरी निघाली पण पूला जवळ येताच रस्ता बंद केलेला दिसला. गाडीतून उतरत चौकशी केली तर समजलं पूल चांगला नाही. म्हणून नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे वाहनास आज तरी परवानगी नाही मिळणार . तिच्या खूप विनंतीही वॉचमन नी ऐकलं नाही. नावेतून नदीपार करावा असा सल्ला दिला असून तो लवकरच. मेघा नाव वाल्या कडे गेली , बऱ्यापैकी सगळेच नाव वाले घरी परतले होते. तेवढ्यात तिच्या नजरेस एक नाव पडली , तिही जायला लागलेली होती. आवाज देत नाव थांबवली व नदी पार करण्यासाठी विनंती केली. पण मेघा कडे पैसे नसल्याने तो तयार होत नाही. त्याची पण दिवसभर कामे झालेली नसते घरी त्याची बायको मुलं वाट पाहत असतात व नदीपार केल्यानंतर तिथून थोडे लांब राहत असल्याने तो काही मान्य करत नव्हता. मेघा पळतच आपल्या चार दिवसाच्या पेंटर मित्राकडे जाती तोही पावसाचे वातावरण बघून जायला आवरत असतो, ती त्याला सगळं सांगते व घरी जाण्यासाठी पैसे मागते, परंतु तो नाही म्हणतो , एवढ्या कमी दिवसाच्या मी पैसे कसे देऊ आणि तोही नकार देतो. घरी फोन करुन आकाशाला आला असेल तो घेण्यासाठी येईल परंतु तिने मोबाईल घरी विसरून आली होती.

अशी होती मेघाची अन् आकाश ची छोटीशी कहाणी. नंतर मेघा काहीतरी करून घरी गेली असेलच. तुम्ही म्हणाल मी तर प्रेम कहाणी सांगणार होते मग ही कोणती कहाणी सांगितली. बरोबर ना असं बोलून वर्गातील असणाऱ्या सर्वांना एक प्रश्न विचारला..,.. तो प्रश्न असा की, या गोष्टीतील पाच पात्र आहेत त्यातील चूक कोणाची…? कोणी या गोष्टीत वेगळी कृती केली असती तर गोष्टीचा शेवट छान झाला असता. वर्गातील सर्वानी उत्तरे दिली . त्यानुसार सहा गट पडले . कोणाला वाटत चुक मेघाची आहे. कुणाला नाव वाल्याची तर कोणाला त्या पेन्टरची, तर कुणाला कोणाची चूक वाटत नव्हती…. तात्पर्य : गोष्ट एकच होती सांगण्याचा वेळही एकच होता… पण ऐकण्याचा दृष्टीकोन आणि त्यावर विचार करण्याचा दृष्टीकोन वेगळा होता…. म्हणून एकाच प्रश्नावर पाच ते सहा प्रकारे उत्तर आले …त्यामुळे खूप काही गोष्टी दृष्टिकोनावर अवलंबून असतात. त्यामुळे दृष्टिकोन चांगला ठेवला तर वाईट गोष्टीतही चांगल्या गोष्टी सापडतील.

Thank you

Thank you so much all of you for your lovely wishes and blessings and support… I’ll try my best to writing so much better than this ☺️

Thank you

Thank you so much all of you for your lovely wishes and blessings and support… I’ll try my best to writing so much better than this ☺️

प्रतिलिपि वर वाचा – “छंद”

“छंद”, वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%9B%E0%A4%82%E0%A4%A6-mhvdcgpysm6s?utm_source=android&utm_campaign=content_share भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

तरुणांनाचा समाजकार्याकडे वाढता ओघ

शहीद मित्र मंडळातर्फे  नवीन उपक्रम राबविला जात आहे. वर्दळीच्या ठिकाणी  सॅनिटाझ करुन आपली माणसं आणि आपला परिसर स्वच्छ ठेवून , दुसऱ्या मित्रमंडळांही आव्हान केले आहे.

कर्वे नगर परिसरातील १-१० गल्ल्यांचा परिसर सॅनिटाझरची फवारणी करुन सुरक्षित करण्याचा उत्तम असा आज शहीद मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आला. त्यात तरुण कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित नोंदवली. या तरुणांच्या साहाय्याने हा उपक्रम पार पडला. त्यात त्यांनी सर्व नियमांचे पालन केले आहे, जसे सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घेतली अन् हातमोजे सर्वांनी वापरले आहे , त्याचबरोबर मास चा ही वापर केला आहे.

शहीद मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जेवढा खर्च होईल तो सर्वच मंदार ताम्हणकर करणार आहे. मंदार ताम्हणकर हे सध्या अॉस्ट्रिलियात कामा निमित्त राहत असून ते पुण्याचेच रहिवासी आहे. रोजच्या या वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या संबंधित बातम्या पाहून काही तरी करावे या हेतूने मंदारनी शहीद मित्र मंडळातील सदस्यांशी संवाद साधला. सगळी आर्थिक साहाय्याची हमी दिली , ते कायम समाज कार्यासाठी तत्पर असतात.

  कर्वे नगर हा परिसर जास्तच वर्दळीच ठिकाण येत. अशि ठिकाणी करोना जास्त धोका जाणवतो. त्यांचाच विचार करून या तरुणांच्या साहाय्याने या उपक्रमात द्वारे सर्वच गल्लीतील प्रत्येक सोसायटीच्या आवारात , घरांच्या भिंती, खिडकी देखील सॉनिटायझरची फवारणी केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत इतर मित्र मंडळ सार्वजनिक कार्यासाठी पुढे येतील हे नक्कीच.

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती

पुण्यात बाहेर गावाहून विविध परिक्षांची तयारी करण्यासाठी  आलेल्या मुला-मुलींना या लॉकडाऊनच्या काळात अनेक अडचणींना  समोरे जावं लागतं आहे.
पुणे: पुण्यातील विविध भागात लांबलांबुन विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी आलेले असतात. करोना चा वाढता पार्दूभाव पाहून ऐन तोंडावर आलेली एम पी एस सी ची सयूक्त सेवा गट ब पूर्व परीक्षा रद्द केली. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या होण्याबद्दलही अनेक शंका. आहेत. बॅंकेच्या काही पदांच्या जागा निघाल्या आहेत. अश्या या गोंधळाच्या अवस्थेत काही विद्यार्थी गावी गेले आहेत, तरी बहुतेक विद्यार्थी पुण्यातच आहेत.

पुण्यात सदाशिव पेठ, कर्वे नगर , सारख्या परिसरात विद्यार्थीची जास्तच संख्या दिसून येते. करोनाची परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढविलेल्या काळात बहुतेक सर्व च अभ्यासिका बंद आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासातील सातत्य राखले जात नाही आणि रुममध्ये अभ्यास करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. त्याबरोबर त्यांच्या समोर दुसरा मोठा प्रश्न आहे तो जेवणाच्या संबंधित. वेळ वाचावा म्हणून अनेक मुलं-मुली जेवण करण्यासाठी खाणावळ हा पर्याय निवडतात. पण आता त्यांना यातही मोठा धोका जाणवतं आहे. जवळपास सर्वच विद्यार्थी या समस्यांना सामोरं जाताना दिसत आहे.

स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक मुलं-मुली धडपडतांना दिसत असतात. स्वतःची काळजी घेतं , परिक्षांच्या तारखांची वाट पाहत , अभ्यासात सातत्य ठेवणं थोडं कठीणच जातं आहे. बहुतेक विद्यार्थी या तणावपूर्ण वातावरणातून सामोरे जाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सर्वच विद्यार्थी अभ्यासिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासातील सातत्य राखले जाईल आणि काही प्रमाणात नुकसान कमी होईल.

देशसेवा

एक दिवस अचानक एका शाळेतील मित्राचा फोन आला. थोडंसं इकडचं तिकडचं बोलणं झालं. करोनाच्या वाढत्या प्रमाणावर बोलत असताना तो गावाकडील परिस्थिती बद्दल बोलत होता. तेव्हा त्याच्या कडून डॉ. विक्रम चौव्हान यांच्या बद्दल माहिती समजली.

या परिस्थितीचा फायदा घेऊन गरिबांना लुबाडणाऱ्या कित्येक बातम्या बाहेर येतात. अन् एकीकडे डॉ. विक्रम यांच्या सारखे स्वार्थ विना काम करताना दिसतात. हे सगळ्यांना माहिती झालं पाहिजे म्हणून च आजचा हा लेखनप्रपंच आहे.

डॉ. विक्रम बबन चौव्हान हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अमळनेर सारख्या छोट्या गावात आपल्या ओपीडी द्वारे काम करतात. त्यांनी BHMS मधून आपलं शिक्षण पूर्ण केले आहे.

या वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे आणि मिडीयातील काही बातम्या मुळे काहींच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतेक जणांना ची आर्थिक परिस्थिती चांगलीच ढासळी आहे. त्यामुळे त्यांना मानसिक आणि आर्थिक साहाय्याची आवश्यकता आहे. आणि हेच डॉ. विक्रम करत आहे. रात्री अपरात्री कुणाचाही फोन आला तरी लगेच सेवेसाठी तत्पर असतात आणि कमी खर्चात उपचार देतात, तसेच करोनाबाधित रुग्णांसाठी पैशाची अडचण आली म्हणून कोणी आडू नये म्हणून काहींना कमी खर्चात किंवा पैसे न घेता उपचार देत आहेत.

देशसेवा कशाला म्हणायची हा प्रश्न खुप जणांना कायम पडतो. लहानपणी शाळेत शिकल्याप्रमाने एखाद्या लढाई मध्ये भाग घेण किंवा देशाच्या. स्वातंत्र्य साठी लढणं… म्हणजे देशसेवा आहे. पण सध्या परिस्थिती बद्दली आहे. ब्रिटिशांच्या तावडीतून नाही तर करोना च्या तावडीतून देशाची सुटका करण्याची जास्त गरजेचे आहे आणि यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच देशसेवा होईल. आपली स्वतःची अन् आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेतली अन् सगळे नियम पाळले तरी देशसेवा होईल. निगिटिव्ह बाजूपेक्षा योग्य बाजु दाखवून लोकांच्या मनातील भिती कमी करुन करोना विरोधात लढण्यासाठी मानसिक आधार देणं म्हणजे देशसेवा होईल.

चला तर छोट्या छोट्या गोष्टी तून अन् आपल्या पासून देशसेवा करुयात. सगळेजण सगळे नियम पाळुन या लढाईत आपलं पण योगदान देऊ.

परिस्थिती बद्दल

वासोटा भेट

     ऐकल खुप होत वासोटा बद्दल. अन् आता जवळून अनुभवल देखील. या प्रवासाची सुरुवात झाली गरवारे कॉलेज पासुन. मी अन् वेदांती बाकी अजुन 20 जण माझ्या साठी अनोळखी होती सगळेच.

रात्री १०:३० ला प्रवासाची सुरुवात झाली, काही वेळातच अंताक्षरी सुरू केली. बघता बघता खुप गाणे झाले, गाण्याचा खजिना येवढा मोठा आहे की २-३ वाजले पण गाणे मात्र संपले नाही. खर तर मला खुपच जास्त मज्जा येत होती, कारण मला गाणे येतच नाही, मग मी ऐकण्याच काम करत होते. गाडीच्या खिडकीतुन बाहेरील अंधारात पाहीले की अस वाटत होत, जणु खाली जमीन वर आकाशातील तारे उतरले आहे, अन् आत सोबतच गाणे जुने, नवे, मराठी, हिंदी सगळ्या प्रकारचे. मस्त मैफिल जमली होती.

गाण्याच्या धुंदीत कधी वासोट्याच्या जवळ पोहोचलो कळालेच नाही, तरी रात्रीचे १:३० ला तिथे पोहचलो. बापरे किती सारे तंबू 🎪 होते, ऐवडी गर्दी होती, खुप सारे ग्रुप आले होते, एका ग्रुपची मस्त गिटार🎸 वाजवत गाणे चालु होते, मध्येच कुणीतरी त्यावर नृत्य💃 करायला लागले, वरती मोकळे आकाश, समोर शेकोटी, अन् थंड हवेचे वातावरण, सोबतच आमच्या ग्रुपचे तंबू तयार झाले व सर्व जण शेकोटी भोवती गप्पा मारत बसले, गप्पा कोणत्या तर भुताच्या…. असेच ३ वाजले सगळे झोपायला गेले, मी अन् वेदांती बाहेरच थांबलो, तंबूत गेले की थंडी जाणवत होती. मग काय वेद आणि मी बाहेर च थांबलो. ४ वाजता तंबू मध्ये गेलो. जोप तर नाही आली. सकाळी ६ वाजता उठलो अन् आवरल. नाष्टा केला अन् मग आमची नावेतून प्रवासाची तयारी सुरु झाली.

काय वर्णन करू, कमी होईल ते पण,तो तीन बाजूंनी डोंगर रांगा नी वेढलेला शिवसागर जलाशय त्यात पडलेल सुर्या च प्रतिबिंब, जसे की पाण्यावर तरंगणारे असंख्य मोती, मध्येच छोटे-छोटे बेट अन् त्यावर त्या पांढरा शुभ्र पक्षाच्या थव्याने तिथले दृश्य अधिकच मोहक बनले होते. नाव जसजशी पुढे जाईल तसा तो शिवसागर दाट अरण्यात शिरल्या सारखाच जाणवत होता. शिवसागरातील प्रवास पुर्ण करुन वासोट्याच्या पायथ्याशी पोहोचलो. आता मोकळे आकाश अन् खाली अथंग पाण्यातील प्रवास नसुन घनदाट जंगलात प्रवास करायचा हे जाणले.

जंगल प्रवास करण्यासाठी अगोदर नाव नोंदणी केली. तीथेच वरील जंगलाची प्रचीती आली. मग आमचा वासोटा किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अन् सुरुवातीलाच मी धडपडले , एक क्षण तर वाटल पाय मुरगळा की काय, पण निरंजनी सावरलं. उठले अन् परत जोशानी चालायला सुरूवात केली. मग काय न थांबता प्रवास सुरु झाला. जंगलात जसे जसे पूढे जाव तस झाडांची वर्दळ वाढतं च होती. जांभा खडकांचे दगड त्यावर चालुन चालुन गुळगुळीत व चमकदार दिसत होते. कोळ्यांनी त्यांचे काम अगदी चोखपणे पार पडली होती , त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर विविध किल्ष्ट जाळे पाहायला मिळतात. त्याच प्रमाणे उंच उंच झाड जसे आभाला शिवण्यासाठी त्यांच्यामध्ये शर्यत लागली की काय असा भास कुणाला ही सहज होईल. त्याचप्रमाणे काही काही ठिकाणी विशाल असे दगड आहेत , जणू काही ती आपल्या स्वागत करण्यासाठी उभी आहेत . तसेच दोन ठिकाणी पाण्याची झरे आहेत आणि त्यातील थंड पाणी आपल्या तील थकवा दूर होण्यास मदत करतात, अन् ते स्वच्छ पाण्याने मन आपोआप शांत होत. असंच काहीसं थांबत , रस्त्यात भेटणारी माणसं आणि झाडं झुडपांशी गप्पा मारत , हळूच मागे पुढे पाहत, २-२:३० तास जंगलातील प्रवास पुर्ण करुन वर पोहोचलो, अजून काही जण मागुन येतं होते. खुप भुक लागली होती, अन् खूप थकलो होतो , असं वाटतं होतं की इथेच झोपले तर निवांत झोप होईल. थोडा आराम करत आणिता ने द्राक्ष खातं गप्पा मारत बसलो होतो. तसेच जेवण करून आम्ही पुढे खरं वासोटा किल्ल्याच्या उर्वरित खूणा पाहण्यासाठी निघालो.

वरती पोहोचलो वर लगेच उजव्या हाताला मारुती मंदिर मोठ्या दिमाखात उभे होते, वर छप्पर नाही, भिंती पण जास्त उंच नाही. त्या मंदिराच्या उजव्या बाजूला एक रस्ता सरळ बाबु कड्याकडे जातो. ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. बापरे धडकी भरणारा आहे हा कडा. सरळ असा जसं की बरोबर कोणी तरी जाणुन कट केला असावा. समोरच असलेल्या डोंगर रांगेत जुना वासोटा दिसतो. अन् एका बाजूलाच शिवसागर जलाशयाच दृश्य पाहून मन थक्क होते. तसेच मंदिराच्या डावीकडे जाणारी वाट आपल्याला कोकणात जाणाऱ्या मार्गदर्शन करते. त्या कड्यावरून नागेश्वर सूळका दिसतो, अन् कोकणाचे मन मोहवून टाकणारे दृश्य पाहायला मिळते.

उतरतीचा प्रवास तर खूपच मजेशीर आहे. अन् त्याचबरोबर जोखीमीचा ही आहे. एक एक पाऊल काळजी पुर्वक टाकावं लागतं. स्वतः वर कसं गतीच्या काळात नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे हे लक्षात येते. आपली गती वाढलेली असती खरी पण ती आपल्याला काळजी नाही घेतली तर खूपच घातक ठरू शकती. वरती जाण्यासाठी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध लढा द्यावा लागतो अन् खाली उतरताना मात्र गुरुत्वाकर्षणामुळे मिळालेल्या गती वरील नियंत्रण ठेवण्यासाठी लढाई सुरू झाली होती. खाली उतरे पर्यंत पायांना मोठं मोठे गोळे आले होते. वेद अन् मी लवकरच एकत्र खाली पोहोचलो. त्यातच निखिल अन् मानसी सोबत ओळख झाली.

वासोट्याला निरोप तर देऊ वाटतं नव्हते, पण तिथले ही काही नियम असतात, त्यामुळे परत बोटांमध्ये बसलो. सगळेच चालून चालून थकले होते. काहीं तर मस्त झोपून घेतलं. पण सायंकाळची वेळ होती वातावरण कसं मस्त झालं होतं, मग मी कशी एवढी सुंदर संधी सोडणार बरं…! अन् ऐकलं होतं की सुर्यास्त खुपचं सुंदर दिसतो मला त्याची उत्सुकता लागली होती. माकडांची जोडी दिसली, पुढे काही अंतरावर निलगाय पाणी प्यायला जलाशय वर आलेली होती. वेगवेगळे पक्षी मस्त आकाशात उंच विहार करत होते, काही पक्षी मध्येच जोरात खालच्या दिशेने येऊन पाण्यात आत बाहेर करत होते. वातावरणांत थंडावा जाणवतं होता, सुर्याची किरणे आता शांत होत, डोंगराच्या मागे लपवण्यात गुंग होऊन गेलेला होता. आपली छटा आकाशात मस्त सोडत होता, त्यामुळे आकाशात रंग पाहून मन प्रसन्न झालं. अन् तो सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या डोंगराच्या रांगेतील सुर्यास्त खुपचं जास्त मनमोहक आहे.

पाण्यामध्ये थोडी मस्ती केली व फ्रेश होऊन, सगळे जण जेवण करण्यासाठी एकत्र जमलो. शाकाहारी लोकांसाठी वेगळा टेबल अन् आम्ही मांसाहारी साठी वेगळा टेबल केले. आम्ही चिकन थाळी घेतली. खूपच चविष्ट असं जेवण होतं, अन् सोबत गप्पा चालू होत्या. सगळेजण आपापल्या जुन्या आठवणी ताज्या करत होते. काही जुन्या ट्रेकच्या आठवणी निघाल्या. जवळपास ९ वाजले होते जेवण करून निघण्यासाठी. सगळेजण थकले असल्याने गाडीत सगळेजण शांत होते, काहीजण झोपले होते. मला तर झोप नव्हती येतं मग मी खिडकीतून डोकावून पाहत बाहेर पडलेल्या अंधारातील प्रकाशाच्या साम्राज्याची देखावे पाहण्यात रमले. खास करून गाडी घाटात प्रवास करत होती , तेव्हा खालील गावांचे दृश्य पडद्यावरील चित्र पाहात असल्याचं वाटतं होतं.

प्रवास कोणताही असो, मनाचे डोळे उघडले, तर दु:ख , थकवा, उदासीनता, सगळं कसं अगदी अदृश्य होत अन् त्याचबरोबर मन प्रसन्न होते.

Create your website with WordPress.com
Get started