
वाचायला सुरुवात करण्या अगोदरच सांगतो….हे कसलं शीर्षक ? नक्की कोणत्या भाषेतील ? असला कोणताही थुकरट सवाल मनात न आणता ही सोशल मीडिया मुक्त विद्यापीठाची स्वतंत्र भाषा आहे असा समज करून आत्मसात करावी. मग मराठी की इंग्लिश की संस्कृत किंवा पाली, हिब्रू, मोडी असे सामान्यज्ञानाचे ‘तारे’ तोडणारे बुद्धिकौशल्य न वापरता बात को समझो ना यार……तर मराठी भाषेतील प्रस्तावना पूर्ण करून मूळ विषयाला सुरुवात करूयात……

सध्या राज्यात सत्तांतरामुळे उडालेल्या चर्चेचा (कट्ट्यावरची विधानसभा) रोख आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा राहिला नाही. देवेंद्रजी यांचातर पूरपरिस्थिती असल्याने महाराष्ट्रातील त्यांच्या समर्थकांनी अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा देखील केला.(दरवर्षी नित्यनेमाने येणारा वाढदिवस थोडीच थांबणार ?) तर एकनाथरावांच्या नातूप्रेमासह फॅमिली फोटोसेशन देखील झाले आहे. आता मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि रुसवेफुगवे याचा अंक झाला की मग दोन वर्षे किरकोळ धुसफूस वगळता कट्टा विधानसभेत फार मोठ्या चर्चा झडतील असे काही वाटत नाही. मग गल्लीतील कट्टा विधानसभा चालणार कशी ? कट्टा विधानसभा देखील लोकशाहीच्या संकेतानुसारच लोकांमधून निर्वाचित (गल्लीतून पुरेसा…
View original post 688 more words