
खूप सारे पुस्तक वाचले…. खुप चित्रपटही ( मराठी, हिंदी, साऊथ, हॉलीवूड…. ) पाहीले….. खुप लोकांशी चर्चा ही केली… पण प्रेमाची ठरावीक अशी कोणतीच व्याख्या, संकल्पना मला करता आली नाही. पण यातून मला काही गोष्टी नक्कीच निदर्शनास आल्या… आज त्याच मी तुमच्याशी चर्चा करणार आहे.
कोणतीही व्यक्ती असो…. प्रत्येकाच पहिल प्रेम आई असते… पण हे कोणी मानत तर कोणी नाही… आपल्या असण्याची पहिली चाहूल सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आईलाच लागते… मग इतरांना… आपल्या पहिला प्रेमाचा स्पर्श ही आपल्या आईचाच होतो… त्या आपल्या लाता मारण्यानी ही आई खुश होत असती…. सगळे कष्ट स्वतःहा सहन करत…. काही महिने आपल्याला तिच्या पोटात जागा देते… अन् नंतर ही ती आपल्याला पालथं पडण्यापासून,बसण्यापासुन, उभा राहण्यापर्यत अन् रडण्या पासून बोलण्या पर्यंत आपल्या प्रत्येक पहिल्या गोष्टीत ती आपल्या सोबत असते… अन् तेही प्रेमानीच…
पुढे आपल्याला कळायला लागतं तसं तसं तिच्या प्रेमळ कौतुकाच रुपांतर रागवण्यात होतं… पण तेही आपल्याच चांगल्या साठी… आई असो वडील असो आपल्यावर जगातील सर्वात जास्त प्रेम करत असतात… त्याच ते प्रेम काळजी, राग , हक्क आदी गोष्टीतून पुढे येत असत… पण आपल्याला ते वेगवेगळे रूप दिसतात.. पण त्यातील प्रेम खुपचं कमी जणांना जाणवत… ज्यांना जाणवत अस वाटतं तेही फक्त कर्तव्याच्या दृष्टीने त्याकडे पाहत असतात…… तिच्या या निरागस प्रेमास huge माहित नसतो माहित असतं ते फक्त प्रेमळ कुशीत घेण… कवटाळणं… अन् नसतं ते आपलं kiss ही माहिती असतं ते फक्त प्रेमळ गालावर चुंबन घेणं….
आई-वडीलांनच असो, बहिण -भावाच असो, आपल्या चांगल्या मित्र-मैत्रिणीच असो… प्रेम सगळ्यांचं असतं आपल्यावर… पण ते आपल्याला बांधुन ठेवणार कधीच नसतं… काळजी पोटी कधीकधी बंधन वाटतात पण आपण आपली काळजी ते घेतात तेवढीच घेऊ शकतो हा विश्वास त्यांना दिला की उरलेसुरलेले बंधन ही नाहींशी होतात…. एवढं सुंदर, निर्मळ, निस्वार्थ, प्रेम आपल्या जवळ असतानाही आपल्या आसपासचे सर्वचजण इतरत्र ते शोधत असतानी आपल्याला दिसतात… असं का होतं..? तर आपण आता प्रेम ज्याला समजतो ते प्रत्येकाच्या समज कक्षेतील ज्याची त्याची वेगवेगळी कल्पना आहे… अन् ती कल्पना आपण वरील लोक सोडुन बाहेर शोधत असतो… अन् तसं आपल्याला मिळालं तर ठिक.. अन् ती कल्पना किती दिवस तग धरते त्यावर ते प्रेम अवलंबून असते….
आपल्या प्रेमानी समोरच्याला त्रास होत असेल तर खरंच ते प्रेम आहे का.. हा एक प्रश्न आहे..? आपल्या प्रेमानी कुणालाही बांधुन ठेवल्या सारखं वाटतं असेल तर नक्कीच एकदा विचार करा की… याला प्रेम म्हणतात की नाही… ? प्रेमात मोकळं वाटलं पाहिजे, पुढे जाण्यास नवी उमेद निर्माण झाली पाहिजे… अन् असं आपल्याला कुणाच्या जिवनात मोकळीक निर्माण करता येतील का… नवी उमेद बनता येईल का ..? यावर नक्कीच विचार केला पाहिजे…
प्रेम नावाची कल्पना खुपचं मस्त आहे … ती मग प्रत्येकानुसार वेगवेगळी का असेना… ती नक्कीच जगावी…. त्या नावाखाली स्वतःला ही अन् दुसऱ्याला ही त्रास न होऊ देता… ती नक्कीच अनुभवावी…. स्वतः वर प्रेम करा… मग बाहेर प्रेमचं प्रेम जाणवेल…. माझ्यावर प्रेम करणाऱ्या मला स्वतःला, आई-वडील , बहिण -भाऊ, मित्र-मैत्रिणी, आणि ज्या नात्यांना नाव नाही तरीही त्यात असणाऱ्या सर्वांना मला या सुंदर अश्या प्रेमाची अनुभूती दिल्या बद्दल धन्यवाद….
यावर तुमची काय कल्याण, विचार आहे नक्कीच कमेंट करुन कळवा…
LikeLiked by 1 person
छान लिहलेस, आवडलं लिहत जा, वाचत जातो..👌
LikeLiked by 1 person
नक्कीच….
LikeLike
चला, आळस झटकून लिहायला तर लागलीस…☺️☺️☺️
LikeLiked by 1 person
हो… आता रोज काही तरी असेल.. विषय खुप आहेत
LikeLiked by 1 person
Correct ❤️
LikeLiked by 1 person
👍🏾 tx for support mi ….
LikeLike
खूप छान अनु, लेख सुंदर पद्धतीने लिहिलंस.. असंच लिहत जा आम्ही वाचत जातो..!!
LikeLiked by 1 person
धन्यवाद!
LikeLike