Design a site like this with WordPress.com
Get started

दृष्टिकोन

एकदा वर्गातून सर्वांचा आग्रह करण्यात आला एक छानशी गोष्ट सांग , पण गोष्ट कोणती सांगावे याचा विचार करत होते तेवढ्यात विचार आला…. चला आज एक मस्त ‘ प्रेम कहाणी’ सांगावी तर ऐका मग…

एका महाविद्यालयात रासायनिक विभागात एक आकाश नावाचा विद्यार्थी होता खूप शांत अन् अभ्यासात हुशार. त्याच्याच महाविद्यालयात एक मेघा नावाची मुलगी देखील होती. दिसायला खूपच सुंदर . एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली, नंतर सतत भेटणं सुरू झालं आणि पुढे काहीच दिवसात ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं .

एक दिवस आकाश शिक्षण पूर्ण होऊन महाविद्यालयात द्वारे एका मोठ्या कंपनीत नोकरीलाही लागला . दोघांनी घरी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितले. घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली. दोघांचं लग्न झालं सोबत राहायला गेली, एक मस्त घर घेतलं होतं. एका नदीकाठी निवांत घर होतं. दोघे मजेत राहत होते.

आकाशला एक दिवस सकाळी कंपनीतून अचानक फोन येतो , त्याला तेव्हा समजतं की त्याला कंपनीच्या एका प्रोजेक्ट निमित्त चार दिवसासाठी परदेशात जावे लागणार आहे. तसे तो मेघाला सांगतोय अन् त्याला आजच निघावे लागणार होतं . त्यामुळे तो घरातली मेघा साठी आवश्यक असणारे सगळ्या गोष्टींची सोय करतो. जास्तीचा गॅस भरला, धान्य भरून ठेवली, गाडीत डिझेल फुल भरल, इत्यादी आणि तो जातो. मेघा घरात एकटी असल्याने तिला करमत नाही, म्हणून ती रोज सायंकाळी नदीकाठी फिरायला जात असे . नदीवरील पूल ओलांडून दुसऱ्या किनारी आपला वेळ घालवत असते. तिथे तिच्या एका पेंटर मुलाशी ओळख होती तो रोज तिथे सायंकाळी पेंटिंग काढण्यासाठी येत असे. दोघांची चांगली मैत्री होती.

असे चार दिवस संपतात व आकाश आज सायंकाळी घरी येणार असतो. रोजच्याप्रमाणे मेघा आकाश यायला वेळ आहे तोपर्यंत नदीकाठी जाऊन येनं होईल म्हणून नदीकाठी जाती. रोजच्या प्रमाणेच फेरफटका मारून पेंटर मित्राशी गप्पा करून घरी येण्यास निघाली. पण आभाळ भरून आलं होतं चांगलंच, त्यामुळे सूर्य मावळायला अजून वेळ असूनही अंधार दाटून आला होता .जोराचा वारा सुटला होता. नदीकाठी पाणी हळूहळू वाढत होतं. ती लगबगीने घरी जाण्यासाठी गाडी कडे गेली. गाडी सुरु केली आणि घरी निघाली पण पूला जवळ येताच रस्ता बंद केलेला दिसला. गाडीतून उतरत चौकशी केली तर समजलं पूल चांगला नाही. म्हणून नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे वाहनास आज तरी परवानगी नाही मिळणार . तिच्या खूप विनंतीही वॉचमन नी ऐकलं नाही. नावेतून नदीपार करावा असा सल्ला दिला असून तो लवकरच. मेघा नाव वाल्या कडे गेली , बऱ्यापैकी सगळेच नाव वाले घरी परतले होते. तेवढ्यात तिच्या नजरेस एक नाव पडली , तिही जायला लागलेली होती. आवाज देत नाव थांबवली व नदी पार करण्यासाठी विनंती केली. पण मेघा कडे पैसे नसल्याने तो तयार होत नाही. त्याची पण दिवसभर कामे झालेली नसते घरी त्याची बायको मुलं वाट पाहत असतात व नदीपार केल्यानंतर तिथून थोडे लांब राहत असल्याने तो काही मान्य करत नव्हता. मेघा पळतच आपल्या चार दिवसाच्या पेंटर मित्राकडे जाती तोही पावसाचे वातावरण बघून जायला आवरत असतो, ती त्याला सगळं सांगते व घरी जाण्यासाठी पैसे मागते, परंतु तो नाही म्हणतो , एवढ्या कमी दिवसाच्या मी पैसे कसे देऊ आणि तोही नकार देतो. घरी फोन करुन आकाशाला आला असेल तो घेण्यासाठी येईल परंतु तिने मोबाईल घरी विसरून आली होती.

अशी होती मेघाची अन् आकाश ची छोटीशी कहाणी. नंतर मेघा काहीतरी करून घरी गेली असेलच. तुम्ही म्हणाल मी तर प्रेम कहाणी सांगणार होते मग ही कोणती कहाणी सांगितली. बरोबर ना असं बोलून वर्गातील असणाऱ्या सर्वांना एक प्रश्न विचारला..,.. तो प्रश्न असा की, या गोष्टीतील पाच पात्र आहेत त्यातील चूक कोणाची…? कोणी या गोष्टीत वेगळी कृती केली असती तर गोष्टीचा शेवट छान झाला असता. वर्गातील सर्वानी उत्तरे दिली . त्यानुसार सहा गट पडले . कोणाला वाटत चुक मेघाची आहे. कुणाला नाव वाल्याची तर कोणाला त्या पेन्टरची, तर कुणाला कोणाची चूक वाटत नव्हती…. तात्पर्य : गोष्ट एकच होती सांगण्याचा वेळही एकच होता… पण ऐकण्याचा दृष्टीकोन आणि त्यावर विचार करण्याचा दृष्टीकोन वेगळा होता…. म्हणून एकाच प्रश्नावर पाच ते सहा प्रकारे उत्तर आले …त्यामुळे खूप काही गोष्टी दृष्टिकोनावर अवलंबून असतात. त्यामुळे दृष्टिकोन चांगला ठेवला तर वाईट गोष्टीतही चांगल्या गोष्टी सापडतील.

Published by anjali jangale

my life my story

12 thoughts on “दृष्टिकोन

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: