पुण्यात बाहेर गावाहून विविध परिक्षांची तयारी करण्यासाठी आलेल्या मुला-मुलींना या लॉकडाऊनच्या काळात अनेक अडचणींना समोरे जावं लागतं आहे.
पुणे: पुण्यातील विविध भागात लांबलांबुन विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी आलेले असतात. करोना चा वाढता पार्दूभाव पाहून ऐन तोंडावर आलेली एम पी एस सी ची सयूक्त सेवा गट ब पूर्व परीक्षा रद्द केली. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या होण्याबद्दलही अनेक शंका. आहेत. बॅंकेच्या काही पदांच्या जागा निघाल्या आहेत. अश्या या गोंधळाच्या अवस्थेत काही विद्यार्थी गावी गेले आहेत, तरी बहुतेक विद्यार्थी पुण्यातच आहेत.
पुण्यात सदाशिव पेठ, कर्वे नगर , सारख्या परिसरात विद्यार्थीची जास्तच संख्या दिसून येते. करोनाची परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढविलेल्या काळात बहुतेक सर्व च अभ्यासिका बंद आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासातील सातत्य राखले जात नाही आणि रुममध्ये अभ्यास करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. त्याबरोबर त्यांच्या समोर दुसरा मोठा प्रश्न आहे तो जेवणाच्या संबंधित. वेळ वाचावा म्हणून अनेक मुलं-मुली जेवण करण्यासाठी खाणावळ हा पर्याय निवडतात. पण आता त्यांना यातही मोठा धोका जाणवतं आहे. जवळपास सर्वच विद्यार्थी या समस्यांना सामोरं जाताना दिसत आहे.
स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक मुलं-मुली धडपडतांना दिसत असतात. स्वतःची काळजी घेतं , परिक्षांच्या तारखांची वाट पाहत , अभ्यासात सातत्य ठेवणं थोडं कठीणच जातं आहे. बहुतेक विद्यार्थी या तणावपूर्ण वातावरणातून सामोरे जाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सर्वच विद्यार्थी अभ्यासिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासातील सातत्य राखले जाईल आणि काही प्रमाणात नुकसान कमी होईल.
Like share comment kra nkki
LikeLiked by 1 person
खूप अवघड आहे परिस्थिती पण स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे आपण ठीक असलो तर स्वप्न कधीही पूर्ण होतील
LikeLiked by 2 people
Thanku amol
LikeLiked by 1 person